तुम्हाला सद्गुरु जग्गी वासुदेव जी बद्दल माहित असेलच, ते आजच्या काळातील एक महान योगी आणि गुरु आहेत, ज्यांनी लाखो लोकांचे जीवन बदलले आहे आणि लोकांच्या जीवनात आनंदाचे स्रोत बनले आहेत. या Sadhguru Quotes In Marathi लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सद्गुरुजींच्या चांगल्या विचारांची यादी देणार आहोत.

Sadhguru Quotes In Marathi

आपल्या जीवनात सद्गुरु जग्गी वासुदेवजींसारखे महान योगी आणि गुरू असणे आवश्यक आहे, कारण आपल्या जीवनाचे एकमेव ध्येय हे मोक्षप्राप्ती आहे, आणि गुरुशिवाय ते जवळजवळ अशक्य आहे. याशिवाय आजच्या धावपळीच्या जीवनात तणावापासून दूर राहुन तणावमुक्त जीवन जगण्यासाठी सद्गुरूंचे आशीर्वाद अत्यंत आवश्यक आहेत.

Sadhguru Quotes In Marathi | सद्गुरु जग्गी वासुदेव सुविचार


1. Sadhguru Quotes In Marathiतुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या सर्वाधिक उपयोगी कसे पडाल ते पहा – मग तुम्ही साहजिकच योग्य कृती कराल.


2. Sadhguru Quotes In Marathiक्षण प्रती क्षण जीवन निसटत जात आहे. त्वरा करा, खरोखर जे मौल्यवान, सत्पात्र त्यावर जीवन एकाग्र करण्याची वेळ आलेली आहे.


3.Sadhguru Quotes In Marathi त्रास आणि अडचणी जेंव्हा जीवनात दाखल होतात, तेंव्हाच तुमच्या व्यक्तिमत्वाचा खरा पैलू दिसून येतो. अन्यथा, जेंव्हा सर्वकांही सुरळीत चाललेलं असेल, प्रत्येकजण मस्त मजेत असल्याचा बहाणा करीत असतो.


4. Sadhguru Quotes In Marathiतुमच्यातील सहजेतेचा भाव तुमच्यात शांतीची शक्ती आणतो.


5. Sadhguru Quotes In Marathiयोग म्हणजे शरीर पिळणे किंवा डोके खाली पाय वर करण्याची कसरत नव्हे. हे सर्वसंपन्न जीवन घडवण्याचे तंत्रज्ञान आहे.


6.Sadhguru Quotes In Marathi केवळ मोक्ष हेच जर तुमच्या जीवनाचे मुख्य लक्ष्य बनेल, तर सर्वकांही उलगडून जाईल. मोक्ष परीघावर नव्हे तर केंद्रस्थानी होतो.


7.Sadhguru Quotes In Marathi परमानंद हा काही फक्त एका व्यक्तीचा गुण नाहीये – तो निसर्गाचाच गुण आहे. या संस्कृतीत आपण याला ब्रह्मानंद म्हणतो, म्हणजे संपूर्ण सृष्टीच परमानंदात आहे.


8.Sadhguru Quotes In Marathi आपल्या भावनांमधे आपले संपूर्ण परिवर्तन घडवण्याची शक्ती आहे. पण त्या तुम्हाला एकतर गटारीत खेचतील किंवा चेतनेच्या अत्युच्च अनुभव शिखरावरसुद्धा नेतील.


9.Sadhguru Quotes In Marathi प्रेम म्हणजे बाह्य कृती नव्हे. तुमचे मुलभूत स्वरूपच प्रेम आहे.


10. Sadhguru Quotes In Marathiतुमच्या आंतरीकता अशा प्रकारे इंजिनीयर करा, जेणेकरून तुम्ही एक परिपूर्ण जीव म्हणून बहरून येण्यासाठी ती तुम्हाला ती मदत करेल.


11. Sadhguru Quotes In Marathiजीवन आपल्याकडून अनेक प्रकारचे खेळ, अभिनय, करामाती करवीत असते. जर तुम्ही तत्पर आहात तर हे आनंदाने करू शकाल.


12. Sadhguru Quotes In Marathiजर जीवनाने तुम्हाला असं काही करू दिलं ज्याबद्दल तुम्हाला खरोखर आस्था आहे, तर हे सर्वांत मोठं सौभाग्य आहे.


13.Sadhguru Quotes In Marathi आत्मज्ञानी जीवांना नेहमी द्विज किंवा ‘दुसऱ्यांदा जन्म झालेले’ म्हणलं जातं. माझी इच्छा आहे की तुम्ही तुमची पशु प्रकृती पुसून टाकून एक परिपूर्ण जीव म्हणून बहरून येवो.


14. Sadhguru Quotes In Marathiअयन संक्रांति बदलाबरोबर सुग्गीचा आशीर्वाद येतो. या उत्तरायणात भरगोस फलप्राप्ती होवो.


15. Sadhguru Quotes In Marathiतुमचं कर्म हे तुमच्यासोबत काय घडतं यातून निर्माण होत नाहीये. तुमचं कर्म तुम्ही तुमच्यासोबत जे काही घडतं ते कसं अनुभवता आणि त्याला कसा प्रतिसाद देता यातून निर्माण होतं.


16. Sadhguru Quotes In Marathiया गणेश चतुर्थीला, माझी इच्छा आहे की विघ्नहर्ता तुमच्या विकासाचा आणि परम मुक्तीचा मार्ग मोकळा करो.


17. Sadhguru Quotes In Marathiसाहसी लोक अर्थशून्य कामे करतात, भयभीत लोक कमीतकमी कामे करतात पण निर्भय लोक जीवन वास्तविक जसे आहे तसे पाहतात, आणि परिस्थितीनुसार जे आवश्यक असेल ती कृती करतात.


18. Sadhguru Quotes In Marathiविविधता एक शक्ती आहे. ती या संस्कृतीत तिच्या समृद्धीतून निर्माण झाली आहे, विभागण्यातून नाही.


19. Sadhguru Quotes In Marathiजरी कर्म हे तुमचं बंधन असलं, तरी जर तुम्ही त्याला योग्यरित्या हाताळलं तर कर्म तुम्हाला तुमच्या मुक्तीच्या दिशेने नेणारी पायरी सुद्धा होऊ शकतं.


20. Sadhguru Quotes In Marathiबुद्धी केवळ विभागवार भेदणे जाणते तर भक्ती म्हणजे सर्वसमावेष्टीत आलिंगन. भक्ती बुद्धिमत्तेचाच एक गूढ पैलू आहे.


21.Sadhguru Quotes In Marathi श्री कृष्णाचे सार त्याच्या अविरत उल्हासामध्ये आहे. प्रेमामध्ये, युद्धामध्ये, सर्व प्रकारच्या संघर्षामध्ये तो एक आनंदी मनुष्य राहिला. जीवन अशाच प्रकारे जगलं पाहिजे.


22. Sadhguru Quotes In Marathiतुम्ही कुणीही असलात, तरी प्रत्येक मनुष्यामध्ये असं काहीतरी आहे, ज्याला तुम्ही सध्या जे काही आहात त्याहून अधिक व्हायचं असतं.


23. Sadhguru Quotes In Marathiसृष्टी वेगवेगळ्या घटकांमधे विभागलेली नाही. सर्वकांही एक अतिविशाल, अखंड प्रक्रीये अंतर्गत घडत आहे.


24. Sadhguru Quotes In Marathiजेवढे तुम्ही जास्त संतुलित आहात, तेवढे तुम्ही जीवनासाठी जास्त सज्ज आहात.


25. Sadhguru Quotes In Marathiएकदा का तुमची नाती दुसऱ्यासोबत आनंद वाटण्याबद्दल असली, दुसऱ्यापासून आनंद पिळून काढण्याबद्दल नाही, मग तुम्ही कुणासोबतही अगदी मस्त नाती जोपासू शकता.


Sadhguru Thoughts In Marathi | सद्गुरू विचार मराठीत


1. योग म्हणजे हेच: जाणीवपूर्वकपणे तुमच्या वैयक्तिक सीमा पुसून टाकणं जेणेकरून तुमचं अस्तित्व वैश्विक होऊन जाईल.Sadhguru Thoughts In Marathi


2. नदी म्हणजे तुमच्या आणि माझ्या पलीकडचे एक जीवन आहे. आपल्या सगळ्यांची एक जन्म तारीख आहे आणि आपल्या मरणाची देखील तारीख आहे. पण नद्या, त्यांच्या जन्माची तारीख कुणालाच माहित नाही, आणि त्यांच्या मरणाची तारीख कधीच येता कामा नाही. चला यासाठी वचनबद्ध होऊया, आत्ता आणि भविष्यासाठी सुद्धा.Sadhguru Thoughts In Marathi


3. जर तुम्ही कालचा दिवस स्वतःमध्ये घेऊन फिरलात, तर तुमचा आजचा दिवस खूप जड बनतो – तुम्हाला तरंगताही येत नाही आणि उडताही येत नाही.Sadhguru Thoughts In Marathi


4. मनुष्यांना मुसलमान, ख्रिस्ती किंवा हिंदू म्हणून ओळखणे मला मान्य नाही. ते मानव आहेत आणि एक मानव म्हणूनच मी त्यांच्याकडे पाहतो.Sadhguru Thoughts In Marathi


5. बहुतांश तरुण वर्ग नवनवीन संभावना शोधण्यात उत्सुकता दाखवतात. जर ते अधिकाधिक जागृत बनतील तर मानव जातीला उज्वल भवितव्य आहे.Sadhguru Thoughts In Marathi


6. मनुष्यामध्ये ज्या प्रकारची क्षमता उपस्थित आहे, त्यासाठी हे खूपच छोटं जीवन आहे.Sadhguru Thoughts In Marathi


7. आपले जीवन म्हणजे काल आणि शारीरिक उर्जा यांचे नृत्यच आहे. दोन्हींचा उत्तम समन्वय साधणे हीच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे.Sadhguru Thoughts In Marathi


8. धारणांवर जर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही दिलासा शोधत आहात. जर उपाय शोधत असाल तर तेंव्हा एक साधक बनता.Sadhguru Thoughts In Marathi


9. यौगिक सराव म्हणजे अन्नासारखे असतात. अन्न, जे खातात त्यांच्याच कमी येतं. योगिक सराव, फक्त जे करतात त्यांच्याच कामी येतात.Sadhguru Thoughts In Marathi


10. आपले आंतरिक विश्व हे अपरिचित क्षेत्र आहे, म्हणून मार्गदर्शन घेणेच सुज्ञपणा वाटतो. गुरु म्हणजे एक जिवंत नकाशा आहे; इंग्रजीत ज्याला आपण GPS: Guru Pathfinding System! गुरु मार्गशोधक प्रणाली म्हणतो.Sadhguru Thoughts In Marathi


11. विश्राम म्हणजे काय हे तेच समजू शकतात जे अतीव तीव्रतेने कार्यशील असतात.


12. तुम्ही लाखो असत्य निर्माण करू शकता, पण सत्य एकच आहे.


13. जर तुम्ही उत्सुक आहात तर जीवनाचा प्रत्येक क्षण एक विलक्षण अनुभव होऊ शकतो. आपला सहज स्वाभाविक श्वासोच्छवास सुद्धा एक उत्कट प्रेम बंधन बनू शकतो.


14. नेतृत्व करणे म्हणजे परिथितीवर वर्चस्व स्थापणे नव्हे, तर तुमच्या अनुयायांना असे प्रबळ, सामर्थ्यवान बनवणे ज्याची त्यांनी कधी कल्पनासुद्धा केली नसेल.


15. जेव्हा तुम्ही समावेशक असता, तेव्हा जीवन घडतं. जेव्हा तुम्ही वेगळा राहता, तेव्हा फक्त तुमचं मानसिक नात्य घडतं.


16. एक खरोखर लोकतांत्रिक दृष्टीकोन म्हणजे प्रतिबंधरहित सर्वांना आपले अभिप्राय मांडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य.


17. मुलांना जन्म देणे हा प्रजननाचा विषय नव्हे – तुम्ही भावी पिढी निर्माण करत आहात. हि एक अतिशय मोठी जबाबदारी आहे.


18. जर तुम्हाला यश हवे असेल तर प्रप्रथम; सर्वात महत्वाची गोष्ट – तुम्ही स्वतः त्यात अडथळा बनू नये.


19. ईश्वराला तुमच्या भक्तीची गरज नाही. भक्तीतून आपण आपल्या भावनेचे अत्युच्च शिखर अनुभवायचा प्रयत्न करतो – हि मात्र मानव हृदयाची उत्कट आकांक्षा.


20. माझा मोक्ष कसा होईल याचा विचार करून नका – तुमच्या संकुचित मर्यादांकडे पहा आणि त्यांच्या परे कसे जाता येईल येथे लक्ष द्या. हाच आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग.


21. ईशा ध्यानयोग हा कोणताही धार्मिक ग्रंथ, तत्वज्ञान किंवा निर्जीव परंपरेवर आधारित नाही – हि एक जिवंत आध्यात्मिक तंत्र प्रणाली आहे.


22. बाह्य जगातील परिश्रम तुम्हाला भौतिक आराम आणि सोयी पुरवतील. केवळ आंतरिक प्रयत्न जीवनाची परिपूर्ण सार्थकता बहाल करतील.


23. अंततः जे तुमचे व्यक्तित्व आहे, तेच बाह्य जगात प्रगट होईल.


24. लोकशाही म्हणजे प्रजेने चालविलेले सरकार. आपल्याला एक महान, उन्नत देश बनवायचा असेल, तर जे कांही आपले कर्तृत्व आहे, ते सर्वोत्कृष्ट कौशल्य आणि संपूर्ण तन्मयतेने पार पाडले पाहिजे.


25. गतवर्षाचे ओझे टाकून नवीन उत्साहात जीवन ओतप्रोत करण्याची हि वेळ आहे.


Sadhguru Daily Quotes In Marathi | सद्गुरू दैनिक कोट्स मराठीत


1. नववर्षात जे जे कांही तुमच्या सानिध्यात येईल त्यात तुम्ही हर्षोल्लासाची भरती व्हा. धरतीवर हा काल आमचा आहे. येणारे नववर्ष भव्य दिव्य करू.


2. संक्रांति आणि पोंगल उत्सव; हे सृष्टीतील सर्वकांही जे मानव जीवन साध्य करते त्यांना आपली हृदयपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहेत. जा! या ऋतूचा आल्हाद चाखा आणि हर्शोल्लासाने हा सण साजरा करा.


3. आध्यात्मिक प्रक्रियेचे मुलभूत तत्व हे कि तुमचे सर्व अनुमान, गृहिते तुम्ही टाकून दिले पाहिजेत – “जे माझ्या जाणीवेत आहे ते जाणतो, जे नाही माहित ते नाही जाणत.”


4. चरितार्थ चालविण्यासाठी तुम्ही जे कांही परिश्रम करता ते सर्वसंपन्न जीवन जगण्यासाठी, ताण तणावाने मरण्यासाठी नव्हे.


5. एक स्थिर कुटुंब, समाज, देश आणि जग आपल्याला हवे असेल, तर आपल्याला प्रत्येक व्यक्तीत स्थैर्य निर्माण करणे आवश्यक आहे.


6. जीवनात कांहीही अनुभवण्याची तुमची क्षमता; हि त्या विषयीचे जितके तुमचे ज्ञान अधिक, तितके ते प्रत्यक्ष अनुभवण्याची क्षमता कमी.


7. निष्कर्ष जेव्हडे जास्त बाळगत जाता; यथार्थ जीवन तेव्हडे कमी कमी अनुभवत जाल.


8. एक सर्वसामान्य जीवन सोयीस्कर असेल पण तेथे आनंद, हर्षोल्लासाचा अभाव असणे स्वाभाविक. याउलट, तुमच्या संकुचित मर्यादा ओलांडण्यात हर्ष, आनंद आहे; पण थोडी फार गैरसोय असेल. याची निवड तुम्ही करावी.


9. सर्वांवर वात्सल्याचा वर्षाव करणे पण स्वतःला मात्र त्याची मुळीच गरज न भासणे – हेच खरे स्वच्छंद स्वातंत्र्य.


10. एक ईश्वरी तत्व सर्वांमधे अभिप्रेत असताना, एकावर प्रीती आणि दुसऱ्याचा द्वेष हे कसे काय तुम्ही करू शकता.


11. या जगाची एकुलती एक समस्या आणि ती म्हणजे – चिक्कार हीनप्रवृत्तीचे लोक. सृष्टीत बाकी सर्वकांही विलक्षण, विस्मयकारक आहे.


12. एक समर्पित व्यक्तीला कधीही असफलता नाही. प्रगतीपथावर केवळ नवनवीन धडे शिकत जाणे एव्हडेच.


13. स्वपरीवर्तनाची प्रचीती तेंव्हा येईल जेंव्हा तुमचे अस्तित्व इतरांचे अभिप्राय किंवा त्यांची उपस्थिती यांवर अवलंबून असणार नाही.


14. जिज्ञासू साधक म्हणजे सक्रीय बुद्धीमत्ता जोपासणे. निरंतर नवनवीन आत्मसात करत जाणे.


15. जे जे अनुभूतीने उमजते केवळ तेच तुम्ही प्रत्यक्षात जाणता, बाकी सर्व कल्पनांचा खेळ आहे. योग हि अनुभूती उंचावण्याचे विज्ञान आहे.


16. तुमचे विचार आणि भावनां व्यतिरिक्त जीवन कितीतरी पटीने आगाध, विशाल आहे. मानसिक प्रपंचातून बाहेर पडून वास्तविक जीवनात अग्रेसर होण्याची वेळ आलेलेली आहे.


17. तुम्ही काय काय करता हे तुमच्यावर अवलंबून, पण जे कांही करता ते संपूर्ण जाणीवपूर्वक, जागरूकतेने केले पाहिजे. हीच मनुष्य म्हणून जगण्याची सार्थकता.


18. एकदा जर का जीवन अमर्याद, अस्सिम असल्याची अनुभूती आली, तुमच्या जीवनातील संभावना सुद्धा अमर्याद, अस्सिम होतील.


19. जीवनात ध्येय कोणतेही असो, जोपर्यंत त्याबद्दल तीव्र तातडी उभारून येत नाही, तोपर्यंत जे जवळ आहे ते सुद्धा अती दूर असल्याचा आभास होईल.


20. या जगासाठी सर्वोत्कृष्ट कृती तुम्ही करू शकता; आणि ती हि “तुम्ही नित्यनेह्मी आनंदी असले पाहिजे”.


21. जे अशक्य ते नाही केलत तर कांहीच अडचण नाही. पण जे शक्य आहे ते जर नाही केलत तुम्ही एक शोकांतिकाच आहात.


22. तुमच्या सभोवताल असलेल्या लोकांबद्दल जर तुम्हाला आपुलकी, आस्था असेल तर तुम्ही स्वतः अशी व्यक्ती बनले पाहिजे कि त्यांना तुमच्या सहवासात असणे आवडले पाहिजे.


23. मनुष्य जीवनाची गुणवत्ता खरोखर तेंव्हाच उंचावेल जेंव्हा आपण आतून बदलू.


25. जीवनातील विविध प्रकारच्या परिस्थितींना आम्ही किती प्रमाणात स्वयंप्रेरणेने सामोरे जातो, यावरून आमच्या अनुभवाची आणि जीवनाची गुणवत्ता ठरते.


26. भक्तीची धुंदच मानवाला जीवनाच्या द्वैतातून मुक्त करते.


27. मनुष्य म्हणून जगणे म्हणजे निसर्गाने घालून दिलेल्या सीमा लंघून, स्वतःहूनही अधिक मोठे असे कांही तरी जीवनात घडवून आणणे.


28. माणसांची सर्वात मोठी समस्या म्हणजे – आपले विचार आणि भावनाना कसे हाताळावे हेच त्यांना कळत नाही.


29. आदियोगी तुम्हाला केवळ आजार, व्यथा आणि दारिद्र्यातूनच नव्हे तर जीवन मरणाच्या मोहपाशातून मुक्ती प्रदान करेल.


30. भरलेले मन किंवा जागरूक मन आणि सचेत असणे या दोन्ही समान अवस्था नव्हेत.


सद्गुरूंचे स्वप्न आहे की या जगात उपस्थित असलेल्या सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करणे आणि मोक्ष हाच जीवनाचा परम धर्म असावा याची जाणीव सर्वांना करून देणे. आम्ही आशा करतो की तुम्ही वर दिलेल्या सद्गुरुजींच्या विचारांच्या यादीतून प्रेरित झाला आहात आणि इतरांचेही भले कराल.

मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो की जर तुम्हाला तुमच्या जीवनात खूप त्रास होत असेल आणि तुमच्या जीवनात वाहतूक हवी असेल तर सतगुरुजींनी दिलेल्या योग साधनेबद्दल नक्कीच माहिती मिळवा आणि मी तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो की ईशा फाउंडेशन, कोईम्बतूरला एकदा भेट द्या आणि इनर इंजिनिअरिंगचा कोर्स पूर्ण करा.

हा Sadhguru Quotes In Marathi लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

हे पन वाचा:

Leave A Reply