तुम्हीही जर प्रेमाच्या महासागरात बुडून गेला असाल आणि प्रेमाची भावना कवितेच्या रूपात जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात, कारण या लेखात आम्ही Love Poems In Marathi माहिती देणार आहोत.

“प्रेम” म्हणजे काय असतं? शब्दांमध्ये नाही सांगता येणार असं हे ब्रह्मांड असतं.” तरी पण प्रेमात व्यक्त व्हायला शब्दांचाच आधार घ्यावा लागतो.

Love Poem In Marathi

थोडक्या शब्दात भावनांचा विशाल भांडार मांडणे शक्य आहे ते फक्त कवितेतून. इथे हि मी असाच प्रयत्न केलेला आहे. प्रेमात अंतरंगातील भाव सांगणाऱ्या काहि कविता मी इथे सादर करीत आहे.

आजकाल कोणीही आपल्या मैत्रिणीला कवितेच्या रूपाने मेसेज करत नाही. पण जुन्या काळी प्रियकर आपल्या प्रेयसीवर आपले प्रेम कवितेच्या रूपात व्यक्त करायचे.

Love Poem In Marathi | प्रेम कविता मराठी

१) कविता

Love Poems In Marathi

तू आहेस तर मी आहे.
मी आहे तर या कविता.
कविता आहे तर प्रेम आहे.
आणि प्रेम आहे तर जीवन.

जीवन आहे तर जीव आहे.
जीव आहे तिथे हृदय.
हृदय आहे तर भावना आहेत.
आणि भावना तिथे तू.

तू आहेस तर मी आहे.
मी आहे तर तुझे हास्य.
तुझे हसनं माझा आनंद आहे.
माझा आनंद तुझे सुख.

तुझे सुख माझे क्षण आहेत.
माझे क्षण माझी ओळख.
तू आहेस तर मी आहे.
आणि मी आहे तर या कविता.

: सुशांत अणवेकर


२) तिचा मूड

Love Poems In Marathi

तिचा मूड म्हणजे एक गूढ.
कधी उन्हाळ्यात आलेली हुडहुड.
तर कधी वैतागलेल्या बाळाची लुडबुड.

तिचा मूड म्हणजे भिजलेलं पान.
कधी वाळवंटात हिरवं रान.
तर कधी काट्यात तुटलेलं वहान.

तिचा मूड म्हणजे सळसळत्या धारा.
कधी नभशिखरातला वारा.
तर कधी अनाथाला निवारा.

तिचा मूड म्हणजे हि एक धोका.
रुतलेला बाभळीचा काटा.
पण, पण, पण,
तिचा मूडच तिच्या असंख्य छटा.
आणि माझ्या जिवंत हृदयाचा एक ठोका.

: सुशांत अणवेकर


३) वाकडं नाक

Love Poems In Marathi

सजनी गोड माझी वाकड्या नाकाची.
शेकडो नाकांमध्ये एकमेव लाखाची.

वाकडं नाक तुझं, हिमालयातला घाट.
शेंडा शिखर तुझा, आणि वळणदार वाट.

भूमितीच्या वहि वर कंपासाची फुली जणू.
विज्ञानाच्या पुस्तकातील अमिबाचा आकार जणू.

वाकडं नाक तुझं. वाकडा बाण जसा.
वाकडा असूनही हृदयात थेट खुपला कसा?

बोटांच्या चिमटीने ओढून जरा पाहू का ग?
कि दातांनी चावा घेऊन प्रयत्न करून पाहू का ग?
नाकाला नाक लावून नाक तुझं मापू का ग?
पण ओठांचं करू काय मी? चिकटपट्टी लावू का ग?

सजनी गोड माझी वाकड्या नाकाची.
शेकडो नाकांमध्ये एकमेव लाखाची.

:सुशांत अणवेकर


४) चुंबन

Love Poems In Marathi

एका चुंबनाचा डाव.
एक प्रेमाचा ग भाव.
भिजलेल्या तया होठांवर,
माया होठांचा मिलाप.

एकमेकांच्या कुशीत,
झोपण्याची तवा घाई.
निमित्त गा थोर.
नजरा दूर कशा राही?

ओठ चुंबक जाहले.
ओठ चुंबन पावले.
एकमेकांचा तो श्वास
एकमेकात धावले.

जीभ जिभेवरी फिरे.
दात ओठांना हा धरे.
पुन्हा पुन्हा करूनही,
ती ओढ का ना सरे?

लाळ लाळ एक झाली.
दोन मन एक झाले.
एका छोट्या शाली मद्दी
दोन अंग एक झाले.

एका चुंबनाचा डाव.
एक प्रेमाचा ग भाव.
भिजलेल्या तया ओठांवर,
माया ओठांचा मिलाप.

: सुशांत अणवेकर


५) आठवण

Love Poems In Marathi

किती आठवावं? नि किती आठवावं तुला?
एवढूस ते हृदय; कुठे साठवावं तरी तुला?

आठवणींच्या जगात माझा दिवस विरून जातो.
येतं गालावर हसू अन क्षण सरून जातो.

कधी हसू हि येतं नि कधी रडू हि येतं.
आठवणींचं ओझं सालं धड जगू हि न देतं.

तरी जिण्याचा आधार त्या आठवणींचाच आहे.
भाव गुलाबी हे माझे सांगा का उगाचाच आहे?

आठवणीचं काहूर मग ओढ तुझी लागते.
कोरोना चा संप हा मग बस खाली सांगते.

तुझ्या आठवणींच्या लहरीत ते व्हायरस जळून मरतील.
थोडा धीर आपण धरू; राहिले दिवस हि सरतील.

तोपर्यंत हँड सॅनिटाइझर संपलेला असेल. आणि तुझ्या हातात माझा हात असेल. इतिहास हेच सांगतो कि, “जब जब दो प्यार करने वालो के बीच कोई आया तो वो साला खाक मे मिल गया।”

: सुशांत अणवेकर


६) चिडके

Love Poems In Marathi

ये चिडके जरा चिडशील का?
चिडून जरा माझ्याशी नडशील का?

माझ्या मजेचे खेळ तुला चिडवण्यात आहे.
माझ्या वेळेचा डाव तुला पिडण्यात आहे.

मी मुद्दाम नाही करत. नाईलाज माझा आहे.
लोकडाऊन च्या टाईमपास चा इलाज हाच आहे.

दार्जिलिंग ची थंडी बघ ना संपतच नाहि.
तू चिडल्या विना इथे शेकोटी पेटतच नाही.

चिडशील तर लक्षात ठेव अबोला नको धरू.
उघडशील तोंड तर, फक्त शिवी नको मारू.

दिवसभर बसून बसून व्यायाम कुठे होतो?
चिडल्यावर जरा तरी कॅलरी बर्न होतो.

पण संयम थोडा ठेव मोबाईल नको फोडू.
वांदे होतील माझे; शेड्युल नको मोडू.

चिडक्या तोंडावरचा तुझा चंद्र भारी दिसतो.
माहीत नव्हतं ना तुला? म्हणून तर सांगतो.

ये चिडके जरा चिडशील का?
चिडून जरा माझ्याशी नडशील का?

शेवटी कसं आहे; माझ्या चिडवण्यात हि प्रेम आहे आणि तुझ्या चिडण्यात हि प्रेम आहे.

:सुशांत अणवेकर


७) सोबत

Love Poems In Marathi

तू सोबत असताना, आयुष्य किती छान वाटतं …. उनाड मोकळं, एक रान वाटतं …. सदैव मनात जपलेलं, पिंपळपान वाटतं …. कधी बेधुंद, कधी बेभान वाटतं …. खरचं, तू सोबत असताना, आयुष्य किती छान वाटतं …


८) स्वास

Love Poems In Marathi

तुझ हसणं, म्हणजे एक नवा श्वास … तुझं सोबत असणं म्हणजे, जणू मी खरचं जगतोय …. असा भास …


९) साथ

Love Poems In Marathi

होता अंधकार सर्वत्र, वाट एकटीच होती …. चालताना एकटेच, साथ कुणाचीच नव्हती …. अशात तुझे येणे झाले …. शुभ्र सहवास तुझा, मन चांदण्यात न्हाले …. अन सोबत तुझ्या, जीवन सुंदर झाले ….


१०) प्रेम

Love Poems In Marathi

विखुरलयं मी माझं प्रेम, तुझ्या सर्वच त्या वाटांवरती ….. लहरु दे नौका तुझ्याही भावनांची, स्वैर, उधाणलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती ….

Poem For Love In Marathi | मराठीत प्रेमासाठी कविता

1. झाले शब्द आठवणींचे

मनातच ते सांडले

विखुरलेल्या शब्दांना काव्यरुप लाभले


2. तिला गर्दी हवी असते,
मला एकांत हवा असतो.
तिला शब्द हवे असतात,
मला शांतता हवी असते.
तिला बाल्कनी हवी असते,
मला कोपरा हवा असतो.

कॉफी दोघांनाही आवडते पण …
तिला कोल्ड हवी असते,
मला हॉट हवी असते.
आवड वेगळी
असली तरीही..

तिला मी हवा असतो,
मला ती हवी असते.


3. “आठवणी सांभाळणे सोप्प असत, कारन मनात त्या
जपून ठेवता येतात, पण क्षण सांभाळणे फार
अवघड असत, कारण क्षणांच्या आठवणी होतात.”


4. हो, हो तुझ्यावरच प्रेम करतो,

सरळ सांगता येत नाही म्हणूनच रोज स्टेटस ठेवतो


5. जीव..

मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल,
अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुर-हुरेल.

मी फिरेन दूर दूर तुझिया स्वप्नात चुर,
तिकडे पाऊल तुझे उंबऱ्यात अडखळेल.

विसरशील सर्व सर्व आपले रोमांच पर्व,
पण माझे नाव तुझ्या ओठांवर हुळहुळेल.

सहज कधी तू घरात लावशील सांज वात,
माझे ही मन तिथेच ज्योती सह थर-थरेल.

जेव्हां तू नाहशिल दर्पणात पाहशील,
माझे अस्तित्व तुझ्या आस-पास दरवळेल.
जेव्हां रात्री कुशीत घेशील माझे गीत,
माझे तारुण्य तुझ्या गात्रातून गुण-गुणेल.

मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद,
माझे आयुष्य तुझ्या अंगणात टप-टपेल. – सुरेश भट.


6. “हरवले होते ते स्वप्न माझे
जे तुझ्या रुपाने परत मिळाले,
रुसले होते ते प्रेम माझे
जे तुझ्या साथिने परत आले,
प्रेम करावं कि नाही अस सदाहि वाटत होतं
पण तुझ्या सुंदर प्रेमाने मला शेवटि करावेच लागले,
तुच आहेस त्या स्वप्नांना जागवणारी,
तुच आहेस त्या रुसलेल्या प्रेमाला हसवणारी.”


7. तुझ्या प्रेमाची आस मला, रोज पाहतो तुला

आज तरी बघशील मला ऑनलाईन तेव्हाच तर देईन मी तुला लाईन


8. तुझी सोबत असताना,
जीवनात फक्त सुखांचीच,
अविरत बरसात असेल
प्रेम काय आहे माहीत नाही,
पण ते जर तुझ्या इतकं सुंदर असेल
तर मला जन्मो जन्मी हवयं.🙇❤️


9. तू घरी नसतेस तेव्हा तुझी उणीव भासते

बायको तू मला माझ्या परिही प्रिय वाटतेस

प्रेमाने तुझ्या मला दिली आयुष्याला दिशा

तू नसशील तर आयुष्याची होईल दशा

कितीही भांडलो तरी नाही होऊ शकत तुझ्यापासून दूर

सतत तू सोबत असावे हीच माझी इच्छा


10. तू सोबत असताना,
आयुष्य किती छान वाटतं….

उनाड मोकळं,
एक रान वाटतं…..

सदैव मनात जपलेलं,
पिंपळपान वाटतं…..

कधी बेधुंद,
कधी बेभान वाटतं…..

खरचं,
तू सोबत असताना,
आयुष्य किती छान वाटतं……


Short Love Poems In Marathi | मराठीतील लहान प्रेमकविता

1. 💝 “जो जो येतो जन्माला,

त्याला कधी प्रेम मुकले नाही..

आयुष्यात एकदा तरी,

प्रेमाच्या गावी जावे..” 💘


2. खरं प्रेम ते असतं

ज्यामध्ये तुमच्या सुखापेक्षा

समोरच्या व्यक्तिच्या सुखाचा

जास्त विचार असतो


3. तुझ्यावर रागावणं देखील जमत नाही,

तुझ्यावर रुसन देखील जमत नाही,

एवढे प्रेम आहे तुझ्यावर की,

तुझ्यावर ओरडणे सुद्धा मुश्किल आहे.

प्रेम आहे तुझ्यावर हे तुला समजत कसं नाही..

काय करावे, काय नाही करावे??

हाच रोज विचार असे..


4. 💝 “तुझे प्रेम मजला आनंद देई..

तुझ्या डोळ्यात वसे माझे जग सारे..

तुझ्या हृदयात वसे प्रेम माझे..

तुझा हात हातात घेऊन ह्या जीवनाचा आनंद घेऊ..

चल एकदा आपण दुर कुठे तरी जाऊ.”💘


5. रात्री जागून विचार करणं

प्रेम नसतं

स्वप्नात तिच्यासंगे जगणं

प्रेम असतं

हातात हात धरुन चालणे

प्रेम नसतं

ती नसताना तिचं असणं

प्रेम असतं


6. तू कविता असशील तक

मला शब्द बनायचं आहे

तुला मिळवायचं नाही तर

मला तुझे व्हायचे आहे


7. 💝 “तुझं आपलं एक बरं असतं,

रागवलो जरी मी तरी तू काही माफी मागणार नाही..

पण मी काही तुला मनवल्या शिवाय

शांत बसणार नाही.”💘


8. एक मिनिटं पण तासांसारखा वाटतो

जेव्हा आपण एखाद्याला खूप मिस करतो


9. घेऊन मला मिठीत

शांत कर या मनाला

मी खूप समजावलयं

आता तूच समजावं याला


10. 💝 “त्या समुद्र किनारी असावे आपले घर..

त्यात करावा आपण आपला सुखी संसार..

तू रोज माझी वाट पाहत..

त्या समुद्र किनारी उभी असे.”💘


Heart Touching Love Poem In Marathi | मराठीतील हृदयस्पर्शी प्रेम कविता

1. 💝 “तुझ्यापासून सुरू होऊन तुझ्या पर्यंत असे..

हे जग माझे तुझ्या अवती भोवती फिरे..

असेच असावे, असेच राहावे..

आयुष्यभर फक्त तुझ्याच विचारात मन माझे

फिरे.”💘


2. तुझ्या नयना

तुझ्या नयना मधी स्वताला न्याहाळून घ्यावे
रोज नव्याने तुला पहावे
पाहताच तुला रिमझिम सरी बरसावी
वाऱ्याची गिरकी हळूच यावी
धुंद व्हावी दिशा सारी
तु माझ्या मिठीत यावी
पक्षांची किलबिल गाणी कानी पडावी
माझ्या राणीला न्याहाळत नजर काढावी
ओल्या रेशमी केसांचा पसारा
माझ्या चेहऱ्याला हळुवार स्पर्श व्हावा
इशकाचा गारवा अंगी चढावा
हातात हात चेहऱ्यावर हसू असावा
क्षणाची धारा थांबून जावी
मनमोकळ निवांत बसून
आठवणींचा खजिना रिकामा करावा
गमती जमती गप्पा मारत
आयुष्याच्या प्रवास असाच सरकत जावा – भाग्यराज


3. पुन्हा त्या पाऊल वाटांवरती

वळू लागले माझे पाऊल

जिथे तू भेटली होती

आणि पावसाची झाली होती चाहूल


4. 💝 “अलगद का होईना तुझा हात तू माझ्या हातात दिला होतास

काहि काळ का असो माझ्या खान्द्याचा तू आधार घेतला होतास.”💘


5. मी तुझ्यावर प्रेम करतो,

हे ओठांवर आणता येत नाही

प्रेम हे असचं असतं

कारण शब्दात सांगता येत नाही


6. उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे

उजाडल्यावरी सख्या निघून जा घराकडे
अजून ही उशीवरी टिपूर चांदणे पडे

उगीच वेळ सारखी विचारतोस काय तू
पुन्हा पुन्हा मिठीतही शहारतोस काय तू
पुन्हा अशी हवी तशी कुणास रात्र सापडे

अजून कुंतलात या तुझा न जीव गुंतला
अजून पाकळ्यांतला मरंदही न संपला
अजूनही कसे तुझे लबाड ओठ कोरडे

अजून थांब लागली जगास झोप आंधळी
दिसेल या नभातही हळूच रात्र सावळी
तुला मला विचारुनी फुटेल आज तांबडे – सुरेश भट


7. वाऱ्याचे असेच असते, हळूच येवून स्पर्शून जाणे,

नि:शब्द कळ्या फुलांना, स्मित देत खुलवून जाणे !

येणे जाणे जरी तयाचे, अस्तित्व तो ठेवून जातो,

स्मरण होता कधी कधी, रोमांचित करून जातो !

मौनाचा पहारा मौनात, बरेच काही बोलून जातो,

स्पर्श आणि मौन याच, भावनेने फुलून जातो !

खेळ असा लपाछपीचा, असाच रंगी रंगुन जातो,

सांज सकाळच्या उन्हात, अलगद मिसळून जातो !

सावरणे ते चांदणीला, स्वभाव गगनाचा तो,

हरवल्या तारकेला, क्षितिजा पल्याड शाधतो !


8. तुझ्यावर माझे प्रेम हे समुद्राच्या

रागासारखा आहे,

इतका शक्तिशाली आणि सखोल तो

कायमचा राहील


9. अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे,

सोबतीला अखेरपर्यंत,

हात तुझा हवा आहे,

आली गेली कितीही संकटे,

तरीही न डगमगणारा

विश्वास फक्त तुझा हवा आहे


10. 💝 “असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे…

असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे…

असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दु:खातही साथ देणारे… ”💘


Love Poem In Marathi For Boyfriend | प्रियकरासाठी मराठीत प्रेम कविता

1. तुझ्यासोबत जोडली मी माझ्या आयुष्याची दोरी

आता तुझ्याचसोबत पूर्ण होईल आयुष्याची शिदोरी

नजर न लागो तुझ्या माझ्या जोडीला

कारण माझ्यासाठी केवळ तुच माझा आधार आणि सखा


2. अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे,

सोबतीला अखेरपर्यंत,

हात तुझा हवा आहे,

आली गेली कितीही संकटे,

तरीही न डगमगणारा

विश्वास फक्त तुझा हवा आहे


3. तू खूप प्रेम करतेस म्हणून

तुझ्याशी भांडायला आवडते

भांडण झाल्यावर

तुझा रुसवा काढायला आवडते

तू जवळ नसल्यावर तुझी

आठवण काढायला आवडते

आणि तू जवळ असल्यावर

तुला चिडवायला आवडते

तुझ्यावर प्रेम करत नाही

हे भासवायला आवडते

आणि तू जवळ नसल्यावर

तुझ्या आठवणीत रडायला आवडते.


4. तुझ्या एका हास्यासाठी

चंद्रसुद्धा जागतो,

रात्रभर तिष्ठत तो आभाळात थांबतो


5. थोडं अंतर राहू दे

क्षणभर तुला डोळे भरुन पाहू दे- चंद्रशेखर गोखले


6. तुला राणी सारखं जपेन,

तुला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही.

एवढे प्रेम करेन तुझ्यावर की तुला

माझ्या शिवाय दुसरे काही दिसणार नाही.

तुला हसवेन, तुला फिरवेन

तुझ्यासोबत मस्करी करेन,

तू आणि मी असे राहू जसे की,

आपण एकमेकांसाठी बनलेले आहोत.


7. तू ओढ लावते मला

मी खेचला जातो पुन्हा

तू सांगते मला, मी सांगतो तुला


8. तुझ्या कुशीत येताना

माझ्या श्वासास वादळं उठतात

या वादळांना भिऊनच माझे डोळे मिटतात- चंद्रशेअर गोखले


9. या मुसळधार पावसातअवचित तुझे येणे,तुझे ते स्मित हास्यअन् गार चिंब वारे.. ह्या पावसात भिजून मीतुझेच नाव घेई ओठी,तुझ्या सोबती हे जीवनहोई बेधुंद आणि मनमोहक…


10. रात्री तुझी आठवण मला झोपू देत नाही

सकाळी तुझे स्वप्न मला उठू देत नाही


Love Poem In Marathi For Girlfriend | मैत्रिणीसाठी मराठीत प्रेम कविता

1. मी मागे नसतानाही,

असल्याचा भास होतो ना तुला!

लोकांशी महत्वाचं बोलतानाही

माझा जोक आठवतो ना तुला!

आपण गर्दीत चालतानाही,

माझ्यासोबत एकांत जाणवतो ना तुला!

इतरांसोबत जोरात हसतानाही,

माझा दुरावा रडवतो ना तुला!

कधी उदास वाटतानाही,

माझा चेहरा हसवतो ना तुला!

तुला नको असतानाही,

माझा आवाज लाजवतो ना तुला!

तू शब्दांनी नाकारतानाही

चेहराच सांगतो ना

मी आवडतो तुला!- विद्या भूतकर


2. दाटून आलेल्या संध्याकाळी

अवचित उन पडलं

तसंच काहीसं पाऊल न वाजवता

आपल्या आयुष्यात प्रेम येतं- सुधीर मोघे


3. एक कटींग चहा पिऊया,

तुझ्या माझ्या प्रेमाचा,

सदैव गोडवा राहील त्यात,

तुझ्या माझ्या ओठांचा😘

सुखाचा क्षण असतो.

आणि ताजेपणा येतो,

जेव्हा माझ्या चहाला,

तुझा स्पर्श भासतो.💕

एक इच्छा पूर्ण व्हावी,

तुझ्यासोबत चहा प्यावी.

नकळत हरवून तुझ्या नजरेत,

सकाळची संध्याकाळ व्हावी.😌

प्रश्न नको करू मला,

तुला ‘ चहा की मी ‘ आवडतो ??

तुझ्यासोबत जगण्याचा

आनंद मला वेडावतो…💙

– वेदांती निंबरे


4. तुझी सोबत असताना,

जीवनात फक्त सुखांचीच,

अविरत बरसात असेल

प्रेम काय आहे माहीत नाही,

पण ते जर तुझ्या इतकं सुंदर असेल

तर मला जन्मो जन्मी हवयं


5. कुणीतरी असावं

गालातल्या गालात हसवणारं

भरलेल्या आसवांचे डोळे पुसरणारं

कुणीतरी असावं आपलं म्हणता येणारं

केल पोरकं जगानं तरी आपले करुन घेणारे


6. “मी दिवस संपण्याची वाट बघतो

कारण रात्री ओढ असते..

मी रात्रीची वाट पाहतो

कारण रात्र स्वप्नांची असते..

मी स्वप्नांची वाट पाहतो.

कारण स्वप्नात तुझी ओढ असते..

मी त्या भेटीची वाट पाहतो

तू माहीत असतेस..

मी तुझी वाट पाहातो कारण

तुझ्या शिवाय मी कोणीच नसतो.”


7. सखे,

हातात हात घेशील तेव्हा

भिती तुला कशाचीचच नसेल

अंधारातील काजवा तेव्हा

सूर्यापेक्षा प्रखर दिसेल

सहवासात तुझ्या,

आयुष्य म्हणजे,

नभात फुललेली चांदणरात असेल


8. प्रेमाची चाहूल लागताच

साद तुला दिली

आयुष्यभराची साथही देईन

पण तू ती निभवण्याची शपथ द्यायली हवी


9. तुझ्या मनातला शब्द मि ओळखावा…

तुझ्या मनातला शब्द मि ओळखावा…

तुझ्या हसण्याचा मला आनंद मिळावा…

प्रत्येक वेळी तुझ्या विषयात माझा लेख असावा…

तुझ्या सारखा जीवलग सात जन्मी मला मिळावा…

माझ्या दु:खात मला तुझा हसरा चेहरा दिसावा…

माझ्या सिक्रेट गोष्टींचा पासवर्ड तुझ्या कडे असावा…

चंद्रा प्रमाणे तुझा गारवा माझ्यात असावा…

तुझ्या सारखा जीवलग सात जन्मी मला मिळावा..


10. चांदण्यात राहणारा मी नाही,

भीतींना पाहणारा मी नाही

तू असलीस नसलीस तरीही

शून्यात तुला विसरणारा मी नाही


Love Poems In Marathi For Her | तिच्यासाठी मराठीतील प्रेम कविता

1. तू घरी नसतेस तेव्हा तुझी उणीव भासते

बायको तू मला माझ्या परिही प्रिय वाटतेस

प्रेमाने तुझ्या मला दिली आयुष्याला दिशा

तू नसशील तर आयुष्याची होईल दशा

कितीही भांडलो तरी नाही होऊ शकत तुझ्यापासून दूर

सतत तू सोबत असावे हीच माझी इच्छा


2. तुझ्या प्रेमाच्या ओंजळीत तू मला सामावून घे

तुझ्या प्रेमाने मला सगळ्या जगाचा विसर पडू दे

प्रेमाची हीच साथ तुझी मला कायम लाभू देत


3. तुझ्यासोबत जोडली मी माझ्या आयुष्याची दोरीआता तुझ्याचसोबत पूर्ण होईल आयुष्याची शिदोरीनजर न लागो तुझ्या माझ्या जोडीलाकारण माझ्यासाठी केवळ तुच माझा आधार आणि सखा


4. बायको, बायको लाडाची बायको

कितीही बोललो तरी घेते कायम समजून

तू आहेस म्हणून आहे माझ्या जीवनाला अर्थ

तू नसशील तर माझे जीवन आहे व्यर्थ


5. प्रेमाने प्रेमासाठी काय केलं

हे जाणून घेणे मला वाटत नाही गरजेचे

तुझे प्रेम हेच माझ्यासाठी खूप काही सांगून गेलं


6. तुझी आठवण म्हणजे कस्तुरी,

कधीच साथ न सोडणारी,

सदैव सोबत दरवळत रहणारी|

पण तशीच हवी हवीशी वाटणारी,

सुखात सात देणारी आणि दुख विसरवणारी |

स्वप्ना जुळवणारी आणि,

स्वप्नात रमवणारी|

पण तिथे मनाला सोडवात नाही,

कारण जितकी सुखद तुझी आठवण,

तितकाच पर्तीचा प्रवास असतो माझ्यासाठी

~ प्रियांका


7. प्रेमाची तुझी साद, मनाला आनंद देते

कितीही कठोर वागलो तरी तू कायम आनंद देतेस

संसार म्हटला की, आल्या कुरबुरी

तरीही त्यातून पार पडत मलाही तू सांभाळतेस

इतकं प्रेम करतेस पण ते कधीही बोलून दाखवत नाहीस

तुझ्यावरील माझे प्रेम मी दाखविल्याशिवाय राहू शकत नाही


8. आता तू म्हणशील

तूझं माझ्यावर प्रेम नाही

पण ते न दाखवण्यातच

मला तुझी माझ्याबद्दलची ओढ दाखवते


9. कस सांगु मी तुला……..

सांगु कस तुला मी साजणी

मन माझे तुझ्यामध्ये गुंतले

तुझ्या एका भेटीने मन माझे फुलले

आयुष्याच्या इंद्रधनुष्याचे रंग बदलले

गर्द रानाच्या काटेरी कुंपणातील फुल मज आवडले

भिती भीतीने मन माझे हरवले

प्रत्येक शण रंगवूनी मी फुलवू लागलो

दुःखाचे ढग मन तुडवू लागलो

आज भिती नाही कुणाची मनाला

फक्त दिसते तिच माझ्या ऋद्याला


10. तुझं माझ्यावरचं प्रेम म्हणजे

गवत पात्यावर फुललेल्या

मोहक फुलासारखं

मोराच्या पिसाऱ्यावरील

वेधक मोरपंखी डोळ्यांसारखं

समुद्रातील फेसाळलेल्या

उधाण लाटेसारखं

क्षितिजावरील उगवलेल्या सूर्याच्या

विखुरलेल्या उन्हासारखं

माळावर चांदण्याची

लयलूट करणाऱ्या चंद्रासारखं


Love Poems In Marathi For Him | त्याच्यासाठी मराठीतील प्रेम कविता

1. तुझ्या कवेत मला

माझे आयुष्य सारे काढायचे आहे

तुझ्या प्रेमाच्या पावसात मला चिंब भिजायचे आहे

तू आहेस म्हणून आहे आयुष्याला माझा अर्थ

तुझ्या नसण्याने सगळाच होईल अनर्थLove Poems In Marathi


2. तुला पाहिलं आणि मनात माझ्या कालवायला लागलं

तुला पाहतच तुझा दिवाना होऊन गेलो

आता हात तुझा माझ्या हातात आहे

आणि हीच साथ मी तुला आयुष्यभर देणार आहेLove Poems In Marathi


3. तो बोलायला लागला की,

मी हरवून जाते,

त्याच्याकडून माझी तारीफ ऐकताच

लाजेने गुलाबी होते.Love Poems In Marathi


4. माझे आयुष्य, माझा सोबती

माझा श्वास, माझं स्वप्न

माझे प्रेम आणि माझा प्राणLove Poems In Marathi


5. केलं आहे मी प्रेम

तुझ्या सुंदर डोळ्यांवर

शांत स्वभावावर

आणि तुझ्या गोबऱ्या गालांवरLove Poems In Marathi


6. तुझ्या कवेत मला

माझे आयुष्य सारे काढायचे आहे

तुझ्या प्रेमाच्या पावसात मला चिंब भिजायचे आहे

तू आहेस म्हणून आहे आयुष्याला माझा अर्थ

तुझ्या नसण्याने सगळाच होईल अनर्थLove Poems In Marathi


7. हजारो नाते असतील पण त्या,

हजार नात्यात

एक नाते असे असते

जे हजार नाते विरोधात असतानासुद्धा

सोबत असतो तो म्हणजे ‘नवरा’Love Poems In Marathi


8. साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला

उशाखाली फोटो तुझा चांदरातीलाLove Poems In Marathi


9. मला तुझी आयुष्यभराची साथ नकोय

तर तू जोपर्यंत आहे तोपर्यंत आयुष्य हवयं.Love Poems In Marathi


10. तुझ्या येण्याने माझे

आयुष्य झाले पुरे

तुझ्या येण्याने माझ्या

जगण्याला मिळाले अर्थ नवेLove Poems In Marathi


प्रिय नवरोबांसाठी मराठी प्रेम कविता | Love Poem In Marathi For Husband

1. तो बोलायला लागला की,

मी हरवून जाते,

त्याच्याकडून माझी तारीफ ऐकताच

लाजेने गुलाबी होते


2. तुझ्या गालावरची खळी पाहून

दिवाना मी झालो

तुझ्या त्या गोड हसण्यावर

मी पुरता वेडा झालो


3. तुझ्या येण्याने माझे

आयुष्य झाले पुरे

तुझ्या येण्याने माझ्या

जगण्याला मिळाले अर्थ नवे.

माझे आयुष्य, माझा सोबती

माझा श्वास, माझं स्वप्न

माझे प्रेम आणि माझा प्राण. 🌹


4. मला तुझी आयुष्यभराची साथ नकोय

तर तू जोपर्यंत आहे तोपर्यंत आयुष्य हवयं


5. तुझ्या आठवणी म्हणजे

मोरपिसाचा हळुवार स्पर्श…

तुझ्या आठवणी म्हणजे

नकळत निर्माण होणारा हर्ष

तुझ्या आठवणी म्हणजे

स्वप्नांनी सजवलेलं एक गाव…

तुझ्या आठवणी म्हणजे

विरह सागरात हरवलेली नाव…


6. तुझं माझ्यावरचं प्रेम म्हणजे

गवत पात्यावर फुललेल्या

मोहक फुलासारखं

मोराच्या पिसाऱ्यावरील

वेधक मोरपंखी डोळ्यांसारखं

समुद्रातील फेसाळलेल्या

उधाण लाटेसारखं

क्षितिजावरील उगवलेल्या सूर्याच्या

विखुरलेल्या उन्हासारखं

माळावर चांदण्याची

लयलूट करणाऱ्या चंद्रासारखं..


7. तुझ्या आठवणी म्हणजे

मोरपिसाचा हळुवार स्पर्श…

तुझ्या आठवणी म्हणजे

नकळत निर्माण होणारा हर्ष

तुझ्या आठवणी म्हणजे

स्वप्नांनी सजवलेलं एक गाव…

तुझ्या आठवणी म्हणजे

विरह सागरात हरवलेली नाव…


8. तुझ्यासोबत जोडली मी माझ्या आयुष्याची दोरी

आता तुझ्याचसोबत पूर्ण होईल आयुष्याची शिदोरी

नजर न लागो तुझ्या माझ्या जोडीला

कारण माझ्यासाठी केवळ तुच माझा आधार आणि सखा.


9. चांदण्यात राहणारा मी नाही,

भीतींना पाहणारा मी नाही

तू असलीस नसलीस तरीही

शून्यात तुला विसरणारा मी नाही.🥰🤞🏼


10. तुझ्या कुकंवाशी माझं

नात

जन्मोजन्मी असावं

मंगळसूत्र गळ्यात

घालताना

तू डोळ्यात पाहून हसावं

कितीही संकटे आली

तरी,

तुझा हात माझ्या हाती,

असावा,

आणि मृत्यूलाही जवळ

करताना,

देह तुझ्या मिठीत असावा


Love Poem In Marathi For Wife | पत्नीसाठी मराठीत प्रेम कविता

1. तू खूप प्रेम करतेस म्हणून

तुझ्याशी भांडायला आवडते

भांडण झाल्यावर

तुझा रुसवा काढायला आवडते

तू जवळ नसल्यावर तुझी

आठवण काढायला आवडते

आणि तू जवळ असल्यावर

तुला चिडवायला आवडते

तुझ्यावर प्रेम करत नाही

हे भासवायला आवडते

आणि तू जवळ नसल्यावर

तुझ्या आठवणीत रडायला आवडते


2. Dear Bayko..

हातात हात घेशील तेव्हा

भिती तुला कशाचीचच नसेल

अंधारातील काजवा तेव्हा

सूर्यापेक्षा प्रखर दिसेल

सहवासात तुझ्या,

आयुष्य म्हणजे,

नभात फुललेली चांदणरात असेल.


3. मी मागे नसतानाही,

असल्याचा भास होतो ना तुला!

लोकांशी महत्वाचं बोलतानाही

माझा जोक आठवतो ना तुला!

आपण गर्दीत चालतानाही,

माझ्यासोबत एकांत जाणवतो ना तुला!

इतरांसोबत जोरात हसतानाही,

माझा दुरावा रडवतो ना तुला!

कधी उदास वाटतानाही,

माझा चेहरा हसवतो ना तुला!

तुला नको असतानाही,

माझा आवाज लाजवतो ना तुला!

तू शब्दांनी नाकारतानाही

चेहराच सांगतो ना

मी आवडतो तुला!


4. तुझ्यावर खूप प्रेम करायचंय मला,

तुझ्या प्रत्येक शब्दांचा आवाज व्हायचंय मला,

तुझ्या हसण्याचं कारण बनायचं आहे मला,

तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन करायचंय मला,

तुझ्या एकटेपणात सहभागी व्हायचंय मला,

तुझ्या अडचणीत साथ द्यायची आहे मला,

तुझ्या या निरागस मनात छोटीशी जागा

बनवायची आहे मला,

तुझ्या डोळ्यात बेधुंद होऊन, तुझ्या जगात

जगायचंय मला,

तुझ्या मिठीत पूर्ण आयुष्य अधिकाधिक सुंदर

करायचंय मला,

खरंच तुझ्यावर खूप प्रेम करायचंय मला….


5. बायको, बायको लाडाची बायको

कितीही बोललो तरी घेते कायम समजून

तू आहेस म्हणून आहे माझ्या जीवनाला अर्थ

तू नसशील तर माझे जीवन आहे व्यर्थ..


6. रोजच भेटत असते “ती”

आजची भेट खास आहे

स्वप्नाप्रमाणेच घडले सारे

सत्य की सारे भास आहे!

ती असता समोर तेव्हाच

मनाचा बांध फूटून जातो

काळजात साठवून सारंच

प्रेमात तिच्या वाहून जातो

रोजच्या सहवासातील जादू

घट्ट बांधून जाते नाजूक नाते

अबोला असला दोघात जरी

डोळ्यांची भाषा सांगून जाते

हे प्रेम नक्की काय असतं?

तुलाच पाहून समजले सारे

दोघांच्या भेटीत हरवलो मी

तुझ्या नजरेत जादूई इशारे


7. मैत्री कशी हळुवार उमलते

उन्हातही मग सावली वाटते

अश्रूत दुःख वाहून जाते

व्यथांनाही हसू येते

मैत्रीविना सारेच फिके

आनंदाचे क्षणही मुके


8. असे असावे प्रेम केवळ

शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे.

असे असावे प्रेम केवळ सावलीतच

नव्हे उन्हात साथ देणारे.

असे असावे प्रेम केवळ सुखातच

नव्हे तर दुखातही साथ देणारे.


9. ती पावसाची सर

कशी आली अंगावर

लट निथळते कशी

थेंब थेंब गालावर

चिंब भिजूनीया आली

अशी नजरे समोर

जणू दिवसा पहावी

रातराणीची बहर

आता हटायची नाही

तुझ्यावरची नजर

गाली हसुनिया सखे

केला भलता कहर

रूप देखणे तुझे हे

मन झाले अनावर

तुझ्या प्रेमानेच आता

सखे मला तू सावर…


10. प्रेमाकडे घेऊन जाणारा मार्ग

खुपच अरुंद असतो

ज्याच्यावरुन दोघेजण

कधीच एकत्र चालू शकत नाही,

कारण त्यांना पुढे

चालण्यासाठी मनापासुन

एक होणे गरजेचे आहे.


हे आहे love poem in Marathi भाषेत. जिवंत भाव असतील तेव्हाच त्या मना कडून लेखणीतून शब्दात उतरतात. आणि पोहचतात वाचकाच्या मनापर्यंत. लिहण्यात हि आनंद असतो आणि वाचनात हि.

लिहलेले लिखाण जेव्हा वाचकाला भावेल; आवडेल तेव्हाच त्या मांडलेल्या शब्दांमध्ये जीव येतो. आणि जिवंत राहतो त्या व्यक्तितील लेखक. आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट मध्ये कळवा.

हे पण वाचा:

धन्यवाद…

Leave A Reply